विजय विकासमतांचा!

Go to contents

 लोकशाही राष्ट्राच्या इतिहासात अशा काही निवडणुका येतात की ज्यांत जनतेचा राजकीय विवेक पणाला लागलेला असतो, जनतेसह राजकीय नेत्यांचा तसेच पक्षांचा साऱ्यांचाच विवेक हा पणाला लागलेला असतो. या राजकीय कारकिर्दीतील अशाच एका निवडणुकीचा सध्या निकाल लागला असून काही पक्ष याचा आनंद साजरा करीत आहेत, तर काही पक्ष दुःख!

        नुकत्याच दिल्ली निवडणुकीच्या लागलेल्या निकालाचे अनेक निष्कर्ष काढता येतील. यांपैकी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे जनतेने इतर मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्द्यांना अधिक महत्त्व दिले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांतही हाच पॅटर्न कामी आला आहे. या दिल्लीच्या “आम आदमी पक्षातर्फे” आता स्थानिक मुद्द्यांवर व विकास कामांवर लक्ष देऊन पुन्हा एकवार शिक्कामोर्तब केलं आहे. नेहमीच इतरांपेक्षा आपलं निराळेपण सिद्ध करणाऱ्या आप पक्षाने विरोधी पक्षावर टीका करण्यापेक्षा सरकारी शाळा, क्लिनिक, मोफत पाणी, वीज, बससेवा या साऱ्या गोष्टींवर भर दिला आहे. 

       अनेक राज्ये आज या दिल्ली मॉडेलचा अवलंब करण्यास इच्छूक आहेत. एकूणच काय तर अलीकडच्या काळात पार पडलेल्या निवडणुकीत, भाजप विरुद्ध पाकिस्तान असा एक कल निवडणुकांना मिळत आहे. पाकिस्तान हा मुद्दा निवडणुकीच्या काळात येणं नवीन नाही, मात्र आताच्या अनेक निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर न होता भलत्याच विषयांवर लढवल्या जात आहेत. यातच CAA व NRC यांमुळेही याची धार वाढली आहे. यातही श्री. अरविंद केजरीवाल यांनी एकहाती हा विजय रथ खेचून आणला आहे. साऱ्या पक्षांच्या अपेक्षा अलगदरित्या हवेत विरून आम आदमी पार्टीसाठी ही निवडणूक खास ठरली आहे. 

       अशाप्रकारे ७० पैकी ६२ जागा या “आम आदमी पार्टी” ने जिंकून दिल्लीमध्ये आपने हॅट्रीकने विजय मिळवत, सदर विजय हा विकासमतांचा आहे असेही म्हंटले जात आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *